SSC Result 2026: पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी! १० वीचा निकाल ९२.०९ टक्के; तुमच्या विभागाचा निकाल किती?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज अखेर जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, यंदाही निकालात मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे.

विभागीय निकाल: कोण ठरले सरस?

अनुक्रमांक विभागाचे नाव निकाल (टक्केवारी)
कोकण ९७.६२%
कोल्हापूर ९५.४७%
मुंबई ९४.९७%
पुणे ९४.२४%
नाशिक ९०.५३%
अमरावती ९०.५०%
नागपूर ८९.०७%
लातूर ८८.४२%
छत्रपती संभाजीनगर ८८.४१%

दहावीचा निकाल ऑनलाईन कसा पाहायचा? (Step-by-Step)

  • सर्वात आधी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in किंवा sscresult.mahahsscboard.in ला भेट द्या.
  • होमपेजवरील ‘SSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा रोल नंबर (Seat Number) आणि आईचे नाव अचूक टाका.
  • ‘Submit’ बटणावर क्लिक करा.तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घ्या.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी:

महत्त्वाची नोंद: निकालात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ज्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत, त्यांनी खचून न जाता आगामी पुरवणी परीक्षेची तयारी करावी. स्वप्न थांबत नाही, जिद्द महत्त्वाची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *