मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा (SSC) निकाल आज, ८ मे २०२६ रोजी जाहीर होत आहे. विशेष म्हणजे, आधी हा निकाल दुपारी १ वाजता लागण्याची शक्यता होती, मात्र आता मंडळाने अधिकृत वेळ बदलून सकाळी ११:३० जाहीर केली आहे. राज्यातील जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता काहीच वेळात संपणार आहे. Dnyanshala.news वर तुम्हाला निकालाच्या सर्व डायरेक्ट लिंक्स मिळतील.
महत्त्वाचा बदल: सकाळी ११:३० वाजता निकाल
दहावीच्या निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, बोर्डाने वेळेत बदल केला आहे. विद्यार्थ्यांनी आता दुपारी १ वाजेपर्यंत वाट न पाहता सकाळी ११:३० वाजता आपले हॉल तिकीट सोबत घेऊन अधिकृत संकेतस्थळावर निकाल चेक करावा.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स:
निकाल कसा पाहायचा? (Steps to Check)
- सर्वात आधी वरीलपैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर ‘SSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा Roll Number (बैठक क्रमांक) अचूक भरा.
- तुमच्या आईचे नाव (Mother’s Name) टाइप करा.
- ‘Submit’ किंवा ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या.
Dnyanshala.news कडून सर्व विद्यार्थ्यांना उज्वल यशासाठी खूप खूप शुभेच्छा!
