मित्रांनो भारतातील लाखो विद्यार्थी आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात, पण चांगल्या स्कोर नंतरही योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा संधी हुकते. तुम्हाला ही चूक करायची नसेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. आम्ही इथे Top NIT Colleges In India ची राज्यवार यादी दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला कॉलेज निवडणे सोपे जाईल. शिवाय, तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार ॲडमिशनसाठी आवश्यक असलेला JEE Mains 2026 Cutoff किती असू शकतो, याचीही सविस्तर माहिती खाली दिली आहे.
भारतातील टॉप 10 NIT कॉलेज (NIRF रँकिंग 2025 नुसार)
विद्यार्थ्यांना कॉलेज निवडताना रँकिंगची मदत होते. तुम्ही खालील तक्ता (Table) वापरू शकता,
| अ.क्र. | NIT चे नाव | राज्य | NIRF रँकिंग (२०२५) |
|---|---|---|---|
| 1 | NIT तिरुचिरापल्ली (Trichy) | तामिळनाडू | 9 |
| 2 | NIT राउरकेला (Rourkela) | ओडिशा | 12 |
| 3 | NIT सुरथकल (Surathkal) | कर्नाटक | 16 |
| 4 | NIT वारंगल (Warangal) | तेलंगणा | 21 |
| 5 | NIT कालिकत (Calicut) | केरळ | 23 |
| 6 | NIT दुर्गापूर | पश्चिम बंगाल | 43 |
| 7 | NIT सिलचर | आसाम | 48 |
| 8 | NIT जयपूर (MNIT) | राजस्थान | 52 |
| 9 | NIT कुरुक्षेत्र | हरियाणा | 58 |
| 10 | VNIT नागपूर | महाराष्ट्र | 60 |
NIT मध्ये प्रवेशासाठी लागणारी टक्केवारी (Expected Cutoff Percentile)
| प्रवर्ग (Category) | Top NIT मध्ये CSE साठी (Safe Score) | कोणत्याही NIT साठी (Minimum Cutoff) |
|---|---|---|
| General (Open) | 99.2 – 99.9% | 95 – 96% |
| EWS | 98.5 – 99% | 93 – 95% |
| OBC – NCL | 98 – 99% | 92 – 94% |
| SC | 90 – 95% | 75 – 80% |
| ST | 85 – 90% | 65 – 70% |
| PWD | 70 – 75% | 40 – 50% |
टीप: वरील टक्केवारी मागील वर्षांच्या ट्रेंडवर आधारित अंदाजित (Expected) आहे. प्रत्यक्ष कटऑफ जागेच्या उपलब्धतेनुसार बदलू शकतो.
होम स्टेट कोटा (Home State Quota) – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी फायदा
मित्रांनो प्रत्येक NIT मध्ये ५०% जागा या ज्या राज्यात ते कॉलेज आहे, त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी VNIT नागपूर मध्ये ५०% जागा राखीव आहेत. त्यामुळे, इतर राज्यांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कमी परसेंटाइलवर सुद्धा VNIT मध्ये प्रवेश मिळू शकतो.
प्रवेश प्रक्रिया (Admission Process Steps)
- NTA कडून JEE Main २०२६ चा निकाल आणि रँक कार्ड (AIR) प्राप्त करणे.
- JoSAA च्या अधिकृत वेबसाइटवर (josaa.nic.in) ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे.
- पसंतीनुसार NIT कॉलेजेस आणि ब्रांचची यादी भरून लॉक करणे.
- मुख्य राउंडपूर्वी मिळणाऱ्या कॉलेजचा अंदाज घेण्यासाठी ‘मॉक लिस्ट’ पाहणे.
- JoSAA च्या ६ फेऱ्यांमध्ये मेरिटनुसार कॉलेज मिळवणे.
- सीट मिळाल्यावर ‘Freeze’ (निश्चित करणे), ‘Float’ (बदल हवा असल्यास) किंवा ‘Slide’ (ब्रांच बदल) पर्याय निवडणे.
- ऑनलाइन ‘Seat Acceptance Fee’ भरून जागा राखीव करणे.
- १०वी, १२वी मार्कशीट आणि इतर कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे.
- जागा शिल्लक राहिल्यास किंवा कमी रँक असल्यास ‘CSAB स्पेशल राउंड’ मध्ये भाग घेणे.
- मिळालेल्या NIT कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करणे.



