AIBE 21 Result 2026 ची प्रतीक्षा संपणार? निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता!

मित्रानो AIBE 21 परीक्षा दिलेल्या कायद्याच्या पदवीधरांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) लवकरच AIBE 21 Result 2026 जाहीर करण्याची शक्यता आहे. अंतिम उत्तरपत्रिका (Final Answer Key) आधीच प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याच आधारे निकाल घोषित केला जाणार आहे.

वकिली (Law Practice) सुरू करण्यासाठी AIBE परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. General आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना किमान 45%, तर SC, ST आणि PwD प्रवर्गातील उमेदवारांना 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवर Roll Number आणि Password वापरून आपला निकाल व स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील.

यंदा परीक्षेत कोणताही प्रश्न किंवा उत्तर वगळण्यात आलेले नसल्यामुळे पात्रता गुणांमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच, जे उमेदवार यावेळी पात्र ठरणार नाहीत, त्यांच्यासाठीही दिलासादायक बातमी म्हणजे BCI आता वर्षातून दोन वेळा AIBE परीक्षा आयोजित करणार आहे.

AIBE 21 Result 2026 ची घोषणा होताच संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *