MPSC Online Exam News: CBT परीक्षा पुढे ढकलली; 2026 मध्ये पूर्व परीक्षा ऑफलाइनच

मित्रांनो MPSC उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संगणकाधारित (CBT) पूर्व परीक्षा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, 2026 ची संयुक्त गट-ब आणि गट-क पूर्व परीक्षा आता पूर्वीप्रमाणे Pen & Paper (ऑफलाइन) पद्धतीनेच होणार आहे.

यापूर्वी 2026 पासून पूर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, विद्यार्थी संघटना, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि विविध स्तरांतून आलेल्या सूचनांनंतर सरकार आणि आयोगाने या निर्णयाचा पुनर्विचार केला. नवीन संगणकाधारित परीक्षा प्रणाली लागू करण्यापूर्वी सर्व परीक्षा केंद्रांची तांत्रिक तयारी, पारदर्शकता आणि उमेदवारांना पुरेसा सराव मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, MPSC ची मुख्य परीक्षा (Mains) पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन होणार असून, संगणकाधारित (CBT) परीक्षा लागू करण्याचा निर्णय सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांनी सध्याच्या पेन-पेपर पद्धतीनुसारच आपल्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *