मित्रांनो NEET UG 2026 चा निकाल येण्यापूर्वीच वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी देशभरातील MBBS जागांमध्ये 9,111 जागांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता देशात एकूण 1,36,139 MBBS जागा उपलब्ध असणार आहेत.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 400 नवीन MBBS जागा वाढविण्यात आल्या असून, राज्यातील एकूण जागांची संख्या 13,099 वर पोहोचली आहे. यामुळे NEET UG मधून वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे.
यंदा 25 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये 7 शासकीय आणि 18 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश असून, या नव्या महाविद्यालयांमुळे हजारो अतिरिक्त MBBS जागा उपलब्ध झाल्या आहेत.
NEET UG 2026 च्या समुपदेशन (Counselling) प्रक्रियेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. वाढलेल्या जागांमुळे प्रवेशाच्या संधी वाढणार असून, अधिक विद्यार्थ्यांना MBBS मध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



