Army Agniveer Result 2026 जाहीर! रीजननिहाय मेरिट लिस्ट प्रसिद्ध, असा तपासा तुमचा निकाल

Army Agniveer Result 2026: भारतीय सैन्याच्या (Indian Army) अग्निवीर कॉमन एंट्रन्स एक्झाम (CEE) 2026 चा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील लाखो उमेदवार ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते, तो आता ऑनलाइन उपलब्ध झाला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांच्या संबंधित Army Recruiting Office (ARO)/Region नुसार मेरिट लिस्ट डाउनलोड करून निकाल तपासता येणार आहे.

1 ते 15 जूनदरम्यान झाली होती परीक्षा

इंडियन आर्मी अग्निवीर कॉमन एंट्रन्स एक्झाम (CEE) 2026 चे आयोजन 1 जून ते 15 जून 2026 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. अग्निवीर भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय सैन्याने अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करून उमेदवारांची प्रतीक्षा संपवली आहे.

रीजननुसार प्रसिद्ध झाली मेरिट लिस्ट

इंडियन आर्मीने निकाल Army Recruiting Zone (ARO) नुसार प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांनी ज्या झोन किंवा भरती कार्यालयातून अर्ज केला होता, त्या संबंधित विभागाची PDF मेरिट लिस्ट डाउनलोड करून त्यामध्ये आपला रोल नंबर तपासावा.

Army Agniveer Result 2026 असा तपासा

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील प्रक्रिया अवलंबावी.

  • सर्वप्रथम भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवरील CEE Results या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्या Army Recruiting Zone (ARO) ची PDF मेरिट लिस्ट निवडा.
  • मेरिट लिस्ट डाउनलोड करून उघडा.
  • PDF मध्ये Ctrl + F (मोबाईलमध्ये Search पर्याय) वापरून आपला रोल नंबर शोधा.
  • रोल नंबर आढळल्यास आपण पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरला आहात.

PDF मध्ये रोल नंबर पटकन कसा शोधाल?

मेरिट लिस्टमध्ये हजारो उमेदवारांचे रोल नंबर असल्यामुळे निकाल शोधण्यासाठी वेळ लागू शकतो. अशावेळी PDF उघडल्यानंतर Ctrl + F (किंवा मोबाईलवरील Search पर्याय) वापरून थेट आपला रोल नंबर टाइप करा. त्यामुळे काही सेकंदांतच निकाल तपासता येईल.

पात्र उमेदवारांना पुढे काय करावे लागेल?

ज्या उमेदवारांचा रोल नंबर मेरिट लिस्टमध्ये आहे, ते पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. त्यांना शारीरिक दक्षता चाचणी (Physical Fitness Test – PFT), शारीरिक मोजमाप चाचणी (PMT), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या पुढील टप्प्यांमध्ये सहभागी व्हावे लागेल. या टप्प्यांचे वेळापत्रक भारतीय सैन्याकडून लवकरच जाहीर केले जाईल.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

या भरतीद्वारे अग्निवीर जनरल ड्युटी (GD), अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (8वी व 10वी), अग्निवीर क्लर्क/SKT, महिला मिलिटरी पोलिस (GD), SOL Tech (NA), हवालदार एज्युकेशन, सिपाही (फार्मा), JCO Religious Teacher, JCO Catering तसेच Havildar Survey Auto Cartographer अशा विविध पदांवर भरती केली जाणार आहे.

महत्त्वाची सूचना

निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे लक्ष ठेवावे. पुढील फिजिकल टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल तपासणीसंबंधीच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणतीही अधिकृत सूचना चुकू नये यासाठी वेबसाइट वेळोवेळी तपासत राहणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *