UPSC CSE Prelims Admit Card 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा (Civil Services Preliminary Examination 2026) चे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेला बसणारे उमेदवार आता आयोगाच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपले ई-प्रवेशपत्र (E-Admit Card) डाऊनलोड करू शकतात. यावर्षी UPSC ने एकूण ९३३ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. उमेदवारांना त्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन आयडी (Registration ID) किंवा रोल नंबर (Roll Number) या दोन्हीपैकी एका पर्यायाचा वापर करावा लागेल.
२४ मे रोजी होणार परीक्षा
UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २४ मे २०२६ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. ही परीक्षा केवळ एक स्क्रीनिंग टेस्ट (Screening Test) असून, यामध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. अंतिम वेळेत वेबसाईटवर येणारा तांत्रिक ताण किंवा सर्व्हर डाऊनची समस्या टाळण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले हॉल तिकीट डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
प्रवेशपत्रावरील ‘या’ तपशिलांची नक्की पडताळणी करा
उमेदवारांनी हॉल तिकीट डाऊनलोड केल्यानंतर त्यावर दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासावी. प्रवेशपत्रावर खालील तपशील दिलेला असतो:
- उमेदवाराचे संपूर्ण नाव आणि लिंग (Gender)
- रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर
- उमेदवाराचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी
- वडिलांचे नाव
- परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता आणि कोड
- परीक्षेची तारीख आणि अचूक वेळ (Reporting Time)
महत्त्वाची सूचना: परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी हॉल तिकीटची मूळ प्रिंट आणि एक वैध ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत असणे अनिवार्य आहे. याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षा केंद्रावर ‘या’ वस्तूंना आहे सक्त मनाई
UPSC ने परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता राखण्यासाठी परीक्षा केंद्रावर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. खालील वस्तू परीक्षा केंद्रात आढळल्यास उमेदवारावर कडक कारवाई केली जाईल:
- मोबाईल फोन (Mobile Phones)
- स्मार्ट वॉच (Smart Watches)
- ब्लूटूथ डिव्हाईस आणि डिजिटल गॅजेट्स
- कॅमेरा किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक संभाषण साधन
UPSC CSE Prelims Admit Card 2026 असे करा डाऊनलोड:
- सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जा.
- होम पेजवर उपलब्ध असलेल्या “E-Admit Card: Civil Services (Preliminary) Examination, 2026” या लिंकवर क्लिक करा.
- नवीन पेजवर दिलेल्या अटी व शर्ती वाचून ‘Yes’ बटणावर क्लिक करा.
- आता तुमच्या सोयीनुसार By Registration ID किंवा By Roll Number चा पर्याय निवडा.
- तुमचा आयडी/रोल नंबर आणि जन्मतारीख (Date of Birth) टाकून लॉगइन करा.
- तुमचे UPSC हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.



